बीड : ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या बहाण्याने मुकादमाची ४७ लाखांची फसवणूक, ७ जणांवर गुन्हा

बीड : आष्टी तालुक्यात ऊस तोडणीचे मजूर पुरविण्याच्या आमिषाने मुकादमाची तब्बल ४७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ऊसतोड मुकादमाने आष्टी पोलीस ठाण्यात सात ऊसतोड मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाईदास शिवदास राठोड (रा. सुभाषवाडी, जि. जळगाव), प्रेमसिंग मोरसिंग चव्हाण (रा. पिंपळगाव कमान, जि. जळगाव), सुनील फकिरचंद राठोड, हिरालाल राजेंद्र पवार (दोघेही रा. धानवाड, जि. जळगाव), अमोल भागवत भोसले, विद्या मनोहर काळे (दोघेही रा. माही, ता. कर्जत) आणि रामेश्वर नहीराज भोसले (रा. कानडी बुद्रुक, ता. आष्टी, जि. बीड) अशी संशयितांची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील शिराळ येथील ऊसतोड मुकादम प्रेमकुमार बापू आजबे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

संशयितांनी साखर कारखान्यांना ऊस तोडणीसाठी मजूर पाठवतो, असे म्हणून आजबे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी लाखो रुपये घेऊनही मजूर पाठवले नाहीत आणि पैसेही परत न केले नाहीत. प्रेमकुमार आजबे यांनी ७ जून २०२३ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संशयितांना एकूण ४७ लाख १३ हजार ९९८ रुपये संशयितांना दिले. लाखो रुपयांची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतरही आरोपींनी ऊसतोडणीसाठी एकही मजूर पाठवला नाही, तसेच ते स्वतःही ऊसतोडणीला आले नाहीत. या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे मुकादम प्रेमकुमार आजबे यांनी शेवटी पोलिसांत धाव घेतली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here