बीड : जिल्ह्यात ५,८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण; ओळखपत्रांचे वितरण सुरू

बीड : जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या सर्वेक्षणासाठी ‘स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण ५,८४५ कामगारांची यशस्वी नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेला जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवून पुढील तीन महिन्यांत हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आणि खऱ्या ऊसतोड कामगारांचीच नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रातिनिधिक स्वरूपात १० ऊसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना हक्काची ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्य शासनाने कामगारांच्या प्रश्नावर दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हा परिषदेचे पोलिस उपअधीक्षक (गृह) उमाशंकर कस्तुरे, सागर बोरा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, समाजकल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांची प्रमुख उपस्थिती होती. किमान तीन वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here