बेळगाव : साखर उद्योगातील शाश्वत विकास, अक्षय ऊर्जेचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, बांबू लागवड आणि जैवइंधन निर्मितीच्या विविध शक्यतांवर एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत मंगळवारी (ता. १३) परिसंवाद झाला. ‘एस. निजलिंगप्पा’ तसेच डी-सायफर लाइफ यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी साखर तंत्रज्ञ सी. बी. पाटील होते. डी-सायफर लाइफच्या संचालिका डॉ. माधुरी हेब्बाळकर, पेस डिजिटेकचे संस्थापक संचालक सिद्धार्थ हेब्बाळकर, प्रवीण हेब्बाळकर, मुख्य अभियंता संजय कुऱ्हाडे, मृदा व जैवइंधन तज्ज्ञ डॉ. दीपक येराटे, रेणुका शुगर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे उपस्थित होते. विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शंकर धरमट्टी यांनी आभार मानले.


















