केंद्र सरकारकडून ऑगस्टसाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा जारी

पुणे : जुलै महिन्यात साखरेचे दर क्विंटलला सुमारे ७०० पेक्षा जास्त रुपयांने वधारले आहेत. देशपातळीवर साखरेच्या उत्पादनात घट, सद्यस्थितीत साखरेचा गतवर्षीपेक्षा असलेला हजर मालाचा कमी साठा आदींमुळे साखरेच्या दरवाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता मागणीच्या तुलनेत जाहीर करण्यात आलेला कोटा हा अपुरा असल्याचा परिणाम म्हणून घाऊक बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली.

सद्यस्थितीत तेजीच्या वातावरणामध्ये व्यापाऱ्यांकडून निविदांमध्ये खरेदी वाढण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठेत एकूणच साखर दरात तेजीची धारणा निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यासाठीही घोषित करण्यात आलेला साखर कोटा हा अपुरा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील साखरेस अन्य राज्यांकडून सध्या चांगली मागणी असल्याचे सांगण्यात येते. त्यातच आगामी श्रावण महिन्यापासून सणासुदीला प्रारंभ होता. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत साखरेस मागणी वाढत असते. त्यामुळे परिणाम साखरेचे दर आणखी वाढण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here