छत्रपती संभाजीनगर : विभागात २६ कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज, उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट शक्य

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या हंगामात १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप करण्यास विभागातील २६ कारखाने सज्ज झाले आहेत. विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांत दरवर्षी सुमारे एक लाख ७१ हजार १८५ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होते. त्यापैकी एक लाख ५९ हजार ४०२ हेक्टरवरील ऊस साखर कारखान्यांच्या गाळपासाठी उपलब्ध होतो. यंदा जिल्हानिहाय लागवड क्षेत्रात बीड जिल्हा ६३ हजार ५१० हेक्टरसह आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४० हजार ५०० हेक्टर, जालना जिल्ह्यात ३८ हजार ४७३ हेक्टर तर जळगावमध्ये तीन हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. मात्र, दुष्काळाच्या स्थितीमुळे ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचे अनुमान व्यक्त होत आहे.

प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्यांनी एक कोटी २२ लाख १३ हजार ९०८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. विभागातील २९ साखर कारखान्यांपैकी तीन बंद असून २६ कारखाने यंदा सुरू राहतील. धुळे जिल्ह्यातील एकमेव कारखाना बंद आहे, तर छत्रपती संभाजीनगरातील दोन कारखाने यंदाही बंद राहतील. याबाबत कृषी अधिकारी एस. एच. जेधे यांनी सांगितले की, शासनाने १५ ऑक्टोबरपासून गाळपास परवानगी दिली आहे. मागील वर्षी मार्चअखेर बहुतांश कारखान्यांत गाळप सुरू होते. जुलैमध्ये हंगामाच्या नियोजनासाठी प्रतिहेक्टरी सरासरी ७० टन उत्पादन गृहीत धरले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, उत्पादनात ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. उसाची उपलब्धता कमी राहिल्यास कारखान्यांचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here