छत्रपती संभाजीनगर : तहसीलदार, पोलिसांच्या मध्यस्तीने ‘बारामती ॲग्रो’ची गव्हाण २८ तासांनी सुरू

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तहसीलदार सारिका भगत आणि पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मध्यस्थीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बारामती ॲग्रो साखर कारखान्याची गव्हाण बंद पाडून सुरू केलेले आंदोलन २८ तासांनंतर स्थगित करण्यात आले. ऊसदरवाढीच्या प्रश्नाबाबत बुधवारी (१८ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि ‘बारामती ॲग्रो’च्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा होणार आहे. तर ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे कारखान्याचे व्यवस्थापक मिलिंद देशमुख यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर आणि पहिली उचल ३,९०० रुपये देण्याच्या मागणीसाठी संघटनेने कारखान्याची गव्हाण बंद पाडली होती. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या आतमधील गेटसमोर ठिय्या मांडला होता. मंगळवारी सायंकाळपर्यंत आंदोलक मागण्यांवर ठाम होते. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन एका दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यानंतर कारखान्याची गव्हाण पुन्हा सुरू झाली. यावेळी संघटनेचे प्रदेश कमिटी सदस्य भाऊसाहेब थोरात, मराठवाडा संघटक पवार, जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे, जि.प. सदस्य डॉ. अण्णासाहेब शिंदे, शिवाजी बचाटे, राजू बोंगाने, रामेश्वर भुसारे, अविनाश डगळे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here