छत्रपती संभाजीनगर : देवगिरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर संचालक मंडळाची मुदत १० मे २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. प्रशासकीय नियुक्त असलेल्या या साखर कारखान्याची त्वरित निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी कामगार युनियनचे सचिव चंद्रप्रकाश जैस्वाल यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केली आहे.

देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनी विक्रीतून १४ कोटी रुपये व २३ कोटी रुपये ऋण वसुली प्राधिकरण कार्यालयाकडे जमा होते. या कारखान्यावर प्रशासक असणे आवश्यक होते. काही महिन्यांपूर्वी बॉयलरची पूजा करून अकुशल संचालक मंडळाने कारखान्याचे गाळप सुरु करण्याचा निर्णय घेतला. संचालक मंडळाने कामगार, शेतकरी आणि सभासदांना विश्वासात न घेता आपली मनमानी केल्याचा आरोप करत कारखान्याची तात्काळ निवडणूक लावण्यात यावी, अशी मागणी जैस्वाल यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here