मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार ऊस दरवाढीची घोषणा: मंत्री राणा

69

लखनौ : राज्य सरकार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामासाठी उसाच्या राज्य सल्लागार किंमतीत (एसएपी) वाढीची घोषणा करेल अशी माहिती ऊस विकास मंत्री सुरेश राणा यांनी दिली.

मंत्री राणा यांनी सांगितले की, एसएपीच्या वाढीचा मुद्दा सरकारच्या विचाराधीन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि इतर घटकांचे हित लक्षात घेऊन दरवाढीबद्दल विचार विनिमय सुरू आहे. सद्यस्थितीत उसाच्या नेहमीच्या प्रजातीचे एसएपी ३२५ रुपये प्रती क्विंटल आहे तर इतर प्रजातींचा दर ३१५ रुपये प्रती क्विंटल आहे. मंत्री राणा यांनी लखनौमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच एसएपीमध्ये वाढीची घोषणा करतील.

ते म्हणाले, देशभरात ऊस गाळपामध्ये उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशध्यम २०१७ पूर्वी इथेनॉलची निर्मिती केली जात नव्हती. मात्र, आता यूपी देशात इथेनॉल उत्पादनातही पहिल्या क्रमांकावर आहे. यासोबतच उसाच्या उत्पादनातही यूपीचे स्थान अव्वल आहे. उसाशी संबंधीत क्षेत्रात ३५,००० जणांना रोजगाम मिळाला आहे. राणा यांनी सांगितले की, यापूर्वीच्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या काळात बंद पडलेल्या साखर कारखान्यांना योगी सरकारने पुनरुज्जीवीत केले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here