मुंबई : वाढत्या साखर दरावर नियंत्रण आणण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खाण्याची साखर आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करून स्वतंत्र दर निश्चित करावे, असा पर्याय ते सुचविणार आहेत. गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चहा, मिठाई, घरगुती पदार्थांपासून ते व्यावसायिक उत्पादनांपर्यंत साखरेचा वापर करणाऱ्या ग्राहक आणि व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे.
त्यावर पर्याय म्हणून खाण्यासाठीच्या साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या साखरेचा स्वतंत्र व्यावसायिक दर निश्चित करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या दोन्हीचे दर हे समान आहेत. त्यामुळे बिस्किट, शीतपेयांसह इतर व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेचे दर वेगळे करावेत, अशी देशमुख यांची मागणी आहे.


















