हरियाणात ऊसावरील टॉप बोअरर रोगावर नियंत्रण

75

कर्नाल : हरियाणात उसावर पडलेल्या टॉप बोअरर रोगामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पिकांवर औषध फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी यासंदर्भात केलेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, टॉप बोअरर रोग नियंत्रणात आल्याचे दिसून आले आहे.

ट्रिब्यून इंडिया डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. त्यामध्ये को ०२३८ या प्रजातीचे क्षेत्र कमी करणे, योग्य वेळी फॉर्म्यूलेशन आणि किटकनाशकांचा प्रयोग आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत टॉप बोअरर रोगाविरोधात कोणत्याही किटकनाशकाची शिफारस करण्यात आलेली नाही. यावर आळा घालण्यासाठी त्रिचोगामा कार्डचा वापर केला जाऊ शकतो. याच्या फवारणीवेळी शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाणी मिसळणे आणि फवारणी चांगली करणे गरजेचे आहे. टॉप बोअरर हा रोग अतिशय घातक असून त्याच्या प्रादुर्भावाने उसाच्या वरील भागाचे नुकसान होते. त्यातून उत्पादनात घट येते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here