देशातील साखरेचे उत्पादन 33 दशलक्ष टन होण्याचा अंदाज: ISMA

नवी दिल्ली : 1 ऑक्टोबर 2023 पासून चालू हंगामात भारतातील साखरेचे उत्पादन मागील हंगामातील 36.62 दशलक्ष टनांच्या तुलनेत 10 टक्क्यांनी घसरून 33.05 दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या मते, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उत्पादनात होणारी संभाव्य घट हे याचे मुख्य कारण आहे.2023-24 हंगामासाठी साखर उत्पादनाचा दुसरा अंदाज जारी करताना, ISMA ने सांगितले की, महाराष्ट्रातील सकल उत्पादन 11.85 दशलक्ष टनांवरून 9.99 दशलक्ष टन आणि कर्नाटकात 6.58 दशलक्ष टनांवरून 4.97 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. तथापि, उत्तर प्रदेशात 11.99 दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

सरकारने आतापर्यंत 2023-24 साठी उसाच्या रस/बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलच्या उत्पादनासाठी केवळ 1.7 दशलक्ष टन साखर वळविण्याची परवानगी दिली असल्याने, साखरेचे निव्वळ उत्पादन सुमारे 31.35 दशलक्ष टन होईल, असे ISMA ने एका निवेदनात म्हटले आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी सुमारे 5.6 दशलक्ष टनांचा प्रारंभिक साठा, 28.5 दशलक्ष टनांचा देशांतर्गत वापर आणि 31.35 दशलक्ष टनांचे निव्वळ उत्पादन लक्षात घेता, 30 सप्टेंबर 2024 रोजी बंद होणारा साठा सुमारे 8.45 दशलक्ष टन असू शकतो.ISMA च्या मते, सरकार आता सध्याच्या ESY (इथेनॉल पुरवठा वर्ष) मध्ये इथेनॉलच्या उत्पादनासाठी सुमारे 1.8 दशलक्ष टन अतिरिक्त साखर वळवण्याची परवानगी देऊ शकते. असे असले तरी, बंद होणारा साठा पुढील हंगामातील सुमारे तीन महिन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा असेल. ऑक्टोबर-जानेवारी या कालावधीत 18.72 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 19.5 दशलक्ष टन होते.

बुधवारी अपडेट जारी करताना, नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) ने सांगितले की, जानेवारीच्या अखेरीस देशभरात एकूण 192.8 दशलक्ष टन उसाचे गाळप झाले. 9.71 टक्के सरासरी रिकव्हरीसह 18.7 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले. NFCSF चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 67.6 दशलक्ष टन उसाचे गाळप केले असून त्यांची सरासरी 9.60 टक्के रिकवरी आहे. राज्यात 6.5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे. परंतु, उत्तर प्रदेशने 57.4 दशलक्ष टन उसाचे गाळप केले आहे आणि 10.5 टक्के सरासरी रिकव्हरीसह 5.77 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे. कर्नाटकातील कारखान्यांनी 37.7 दशलक्ष टन उसाचे गाळप केले आहे. 9.75 च्या सरासरी रिकव्हरीसह 3.7 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले आहे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here