‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

Listen to this article

गुरुवार – २२ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरातील बाजारात साखरेला मागणी कमी होती. महाराष्ट्रात मुख्यतः सांगली व कोल्हापूर मध्ये कामगार देणी मुद्द्यामुळे वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी ठप्प होती. कारखान्यांचे भाव ३११० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१५० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२१० ते ३३४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४२५ ते ३५०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजारात आज काही हालचाल दिसून नाही आली. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०९.३० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.४७ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०२०० ते २०५०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१५०० ते २१८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.८१ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४०४३ रुपये प्रति बॅरेल आणि क्रूड WTI ५६.१५ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स ५८७ अंकांनी पडून ३६४७२ अंकांवर तर एनएसई निफ्टी १७७ अंकांनी खाली येऊन १०७४१ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here