‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

104

गुरुवार – २२ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरातील बाजारात व्यवहार शांत होता. कारखान्यांचे भाव ३११० ते ३१३० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१२० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३३० ते ३३७० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३१० ते ३३५० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२१० ते ३३४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३३७५ ते ३५०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजारात आज काही हालचाल दिसून नाही आली. लंडन व्हाईट शुगर मार्केट सुट्टी असल्याने बंद राहीले. तर यु.एस साखरेचा व्यापार ११.५२ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०२०० ते २०५०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१५०० ते २१८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७२.०२ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.११ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९३८ रुपये प्रति बॅरेल आणि क्रूड WTI ५४.५२ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स ७९२ अंकांनी पडून ३७४९४ अंकांवर तर एनएसई निफ्टी २२८अंकांनी खाली येऊन ११०५७ वर थांबले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here