‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

94

गुरुवार – २९ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यासाठी रीलिझ ऑर्डर कमी होईल, या शंकेला धरून मागणीत वाढ झाली. महाराष्ट्रात शिवशक्ती शुगर्स लिमिटेडचे पुढील आठवड्यातील टेंडर – S/१ ३२०० रुपये तर M/३० ३३०० रुपयाने बुक झाले आहेत. महाराष्ट्रात, कारखान्यांचे भाव ३११० ते ३१७० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१२० ते ३१६० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३२६० ते ३३९० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३३० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२०० ते ३३२० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०८.२० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.४० सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०२०० ते २०५०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१५०० ते २१८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.७७ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.१ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४०१९ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५.८९ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स ३८२ अंकांनी खाली येऊन ३७०६८ अंकांवर तर एनएसई निफ्टी ९७ अंकांनी पडून १०९४८ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here