ऊस उत्पादनात घट, व्यापारी, ट्रेडर्सकडून खरेदीमुळे साखरेची दरवाढ : ‘विस्मा’ अध्यक्ष बी. बी. ठोंबरे

छत्रपती संभाजीनगर : गेल्या १५ दिवसांत साखरेचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवरून थेट ६५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. देशातील साखरेचे कमी झालेले उत्पादन, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३० लाख टनांनी झालेली घट तसेच इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे साखर व्यापारी व ट्रेडर्सनी मोठ्या प्रमाणात केलेली साखर खरेदी ही सध्याच्या साखर दरवाढीमागील कारणे आहेत, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष तथा नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना दिली. साखर कारखान्यांचा या दरवाढीशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ साखर उद्योजक तथा ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून दरमहा साखर विक्री कोटा दिला जातो. तितकीच साखर विक्री करणे कारखान्यांना बंधनकारक असते. या भाववाढीमध्ये साखर कारखान्यांचा कुठलाही रोल नसतो. साखर भाववाढीवर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून पावले उचलले जात आहेत. सणासुदीत साखरेची उपलब्धता पुरेशी व्हावी, यासाठी १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर्स फॅक्टरीजचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणााले की, जे कारखाने आर्थिक अडचणीत होते, त्यांनी हंगामात रिलीजपेक्षा जास्त साखर विक्री केली. परंतु, स्टॉक मात्र तितकाच दाखविला. सरकारकडे अद्यापही तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. बहुतांश गोदामात साखर कमी असल्याची कुणकुण लागल्याने साखर चढ्या भावाने विक्री सुरू झाली. आयात साखर आणि नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे दर कमी होतील.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here