कर्नाटकमध्ये ऊस दरवाढीची मागणी तीव्र, राज्यात शेतकऱ्यांची निदर्शने

म्हैसूर : ऊसाच्या योग्य तथा लाभदायी दरात (FRP) वाढ करण्याच्या आपल्या मागणीच्या समर्थनार्थ गुरुवारी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने म्हैसूर-उटी रोडवर निदर्शने केली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या ३०५० रुपयांच्या एफआरपीच्या तुलनेत ३५०० रुपये प्रती टन एफआरपी मिळावी अशी मागणी केली आहे. कर्नाटक ऊस उत्पादक शेतकरी संघाने या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी बाह्य वळण रस्ता आणि एपीएमसी रोडवर एकत्र येत वाहतूक बंद पाडली. परिणामी काही काळासाठी या परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी तातडीने वाहतूक इतर मार्गाने वळवून ट्रॅफिक जॅम वाढू नये याची काळजी घेतली.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरील ‘उरिलु सेव’चे आंदोलन केले. संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांता कुमार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सरकार वारंवार खोटी आश्वासने देत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्याबाबत सरकार गंभीर नाही. सरकार फक्त साखर कारखानदार, बांधकाम व्यावसायिक, उद्योगपतींचा प्रभाव सरकारवर आहे. शेतकऱ्यांची बाजू मांडणारे सरकारमध्ये कोणीही नाही, असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here