धाराशिव : बाणगंगा साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, थकीत ऊस बिलांची मागणी

धाराशिव : ऊस गाळप होऊन अनेक दिवस उलटूनही बिले मिळाली नसल्याने बाणगंगा साखर कारखान्यासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी गेटला कुलूप ठोकल्याने काही काळ कारखान्यातील ये-जा विस्कळीत झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी परंडाचे पोलिस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने कारखाना प्रशासन व शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. यावेळी प्रशासनाने थकीत उसाची बिले अदा करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

थकीत उसाची बिलांसाठी सकाळी नऊपासून सुरू झालेल्या आंदोलनात १८२ शेतकऱ्यांनी सहभागी नोंदवून जोरदार घोषणाबाजी केली. सध्या खरीप हंगामाची तयारी, मशागत, बियाणे, खते व इतर शेतीखर्च भागविणे कठीण झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. थकीत ऊस बिले तातडीने अदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कारखान्याच्या गेटसमोर हे ठिय्या आंदोलन झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांची समजूत काढली. प्रशासनाशी चर्चा केली. ऊस बिले त्वरीत देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here