धाराशिव : ऊस गाळपात कळंब तालुका अग्रेसर, एकाच तालु्क्यात २५ टक्के ऊस गाळप

धाराशिव: यंदाही धाराशिव जिल्ह्यातील गाळपात कळंब तालुका ऊस गाळपात अग्रेसर ठरला असून, जिल्ह्यात झालेल्या एकूण गाळपात कळंबचा हिस्सा तब्बल २५ टक्के इतका आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ६१ लाख मेट्रिक टन ऊसापासून ४९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. यात एकट्या कळंब तालुक्याचा २८ टक्के वाटा आहे. इथल्या रांजणी, हावरगाव व चोराखळी येथील तीन साखर कारखान्यांत तब्बल १३ लाख ३० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. रांजणीचा नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज १० लाख १० हजार मेट्रिक टनाचे गाळप करून यंदाही जिल्ह्यात ‘टॉप’ला राहिला. साखर उत्पादनातही ८ लाख ८८ हजार क्विंटल उत्पादन घेत तो अव्वल राहिला. २ नोव्हेंबरला श्रीगणेशा अन् ३१ मार्चला सांगता करून तब्बल १४५ दिवस क्रशिंग करून सर्वाधिक गाळप दिवसाचा तो मानकरी ठरला.

जिल्ह्यातील ८ खासगी व ६ सहकारी अशा १४ साखर कारखाने २०२५-२६ च्या गाळप हंगाम घेतला. त्यांनी ६१ लाख २८ हजार मे. टन उसाचे गाळप केले. यात कळंब तालुक्यातील रांजणीच्या नॅचरलचे १० लाख, हावरगावच्या डीडीएनचे ३ लाख, चोराखळीच्या धाराशिव शुगरचे २ लाख १७ असा एकूण तब्बल १५ लाख २९ हजार मेट्रिक टन एवढा वाटा आहे. कळंब तालुक्यातील तीन खासगी साखर कारखाने, चार गुळ कारखान्यांनी कमी-अधिक प्रमाणात गाळप घेतले. जिल्ह्यात जिल्ह्यात नॅचरलच्या खालोखाल मंगरूळच्या (तुळजापूर) कंचेश्वरने ६ लाख २९ हजार, समुद्राळच्या (उमरगा) क्विनर्जीने (भाऊसाहेब बिराजदार स. सा) ५ लाख ७८ हजार, भूमच्या आयान मल्टिट्रेडने (बाणगंगा स. सा) ५ लाख ७६ हजार मे. टन गाळप केले. तर तालुकानिहाय विचार करता कळंब तालुक्यातील तीन कारखान्यांनी १५ लाख, परंड्याच्या दोन युनिटनी १० लाख ८७ हजार, धाराशिवच्या दोन युनिटनी ९ लाख ९२ हजार, वाशीच्या तीन कारखान्यांनी ४ लाख १९ हजार मे. टन गाळप केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here