व्यापार कराराच्या चर्चेदरम्यान अमेरिकेला भारताची निर्यात ११ टक्क्यांनी वाढून ५०.८० अब्ज डॉलरवर पोहोचली

नवी दिल्ली : भारताची अमेरिकेला होणारी निर्यात आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ११ टक्क्यांनी वाढून ५०.८० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आर्थिक संबंध अधिक मजबूत करणे आणि बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करणे या उद्देशाने भारत आणि अमेरिका प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर (BTA) चर्चा करत असतानाच निर्यातीत ही वाढ नोंदवण्यात आली आहे. वाणिज्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत अमेरिकेला भारताची निर्यात ४५.७३ अब्ज डॉलर होती.

अमेरिका खंडातील देशांना भारताची एकूण निर्यात १३ टक्क्यांनी वाढून ६६.८२ अब्ज डॉलर झाली. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ५९.३० अब्ज डॉलर होता.भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराबाबत (BTA) चर्चा सुरू असताना निर्यातीत ही वाढ झाली आहे. बाजारपेठेतील प्रवेश अधिक सुलभ करणे आणि व्यापारातील अडथळे दूर करणे हा या कराराचा उद्देश आहे.अमेरिकेच्या एका शिष्टमंडळाने २ आणि ३ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी सीमाशुल्क प्रक्रिया आणि व्यापार सुलभीकरणासंदर्भात चर्चा केली.

ChiniMandi WhatsApp Channel

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वी सांगितले होते की, प्रस्तावित करारासंदर्भातील बहुतांश चर्चा पूर्ण झाली असून, दोन्ही देश उर्वरित तपशीलांना अंतिम स्वरूप देण्याचे काम करत आहेत. या करारासाठीची चर्चा फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झाली होती.या क्षेत्रातील भारताच्या इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये ब्राझीलला होणारी निर्यात १४ टक्क्यांनी वाढून ४.३३ अब्ज डॉलर झाली, तर मेक्सिकोला होणारी निर्यात २६ टक्क्यांनी वाढून ३.४५ अब्ज डॉलरवर पोहोचली. भारत-कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत (CEPA) चर्चा सुरू असताना कॅनडाला होणारी निर्यात १८ टक्क्यांनी वाढून २.६७ अब्ज डॉलर झाली.

आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत युरोपला भारताची निर्यात ८ टक्क्यांनी वाढून ५१.०४ अब्ज डॉलर झाली. यामध्ये ब्रिटनला होणारी निर्यात ७ टक्क्यांनी वाढून ७.३२ अब्ज डॉलर, तर जर्मनीला होणारी निर्यात १२ टक्क्यांनी वाढून ६.३४ अब्ज डॉलर झाली.भारत आणि युरोपीय महासंघाने (EU) जानेवारी २०२६ मध्ये मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटी पूर्ण केल्या. सध्या दोन्ही बाजू या करारावर स्वाक्षरी आणि त्याच्या अंमलबजावणीच्या दिशेने काम करत आहेत.

दरम्यान, भारत-ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) १५ जुलै २०२६ पासून लागू झाला. या करारामुळे ब्रिटनला होणाऱ्या भारताच्या जवळपास ९९ टक्के निर्यातीला शून्य आयात शुल्काचा लाभ मिळत आहे. सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आफ्रिकेला होणारी भारताची निर्यात ४४ टक्क्यांनी वाढून ३१.४२ अब्ज डॉलर झाली. तर आशियाई देशांना होणारी निर्यात २१ टक्क्यांनी वाढून १०३.८४ अब्ज डॉलरवर पोहोचली. यावरून भारताच्या निर्यात बाजारपेठांचा विस्तार व्यापक प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here