‘ई २० जनता पार्टी’ची वाहनधारकांना १०० टक्के शुद्ध पेट्रोलचाही पर्याय देण्याची मागणी, सोशल मीडियावर वाढतोय पाठींबा

नवी दिल्ली : सध्या सर्व इंधन स्टेशनवर फक्त ई २० पेट्रोलच विकले जात असल्याने, आपल्याकडून निवडीचा हक्क हिरावून घेतला गेल्याची भावना वाहनधारकांमध्ये आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) कडून प्रेरणा घेत आता ‘ई २० जनता पार्टी’ नावाचा एक नवा डिजिटल ग्रुप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सक्रिय झाला आहे. लोकांना शुद्ध १०० टक्के पेट्रोलचा पर्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. इंधन धोरणात ग्राहकांना पारदर्शकता, माहितीवर आधारित पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व मिळाले पाहिजे. ई २० मुळे वाहनांच्या मायलेजमध्ये ८ ते १५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा वाहनधारकांनी केला आहे. जुन्या वाहनांच्या इंजिनचे नुकसान होणे आणि दुरुस्तीचा खर्च वाढणे यांसारख्या समस्याही समोर येत आहेत, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

ई २० जनता पार्टी या नाावाखाली एकत्र आलेल्या लोकांनी सरकारने अनिवार्य केलेल्या ई २० इथेनॉल मिश्रित पेट्रोलऐवजी ग्राहकांना १०० टक्के शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जावा, ही प्रमुख मागणी केली आहे. वाहनधारकांचा तीव्र असंतोष यातून दिसून येत आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टनुसार, ‘E20 जनता पार्टी’ हे नागरिकांच्या नेतृत्वाखालील एक ग्राहक हक्क आंदोलन आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला इंधन स्टेशनवर मिश्रित इंधनासोबतच १०० टक्के शुद्ध पेट्रोल निवडण्याचा आणि खरेदी करण्याचा अधिकार असावा. इथेनॉल हटवण्याची मागणी नाही: आम्ही कोणतीही सबसिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित इंधन पूर्णपणे बंद करण्याची मागणी करत नाही. आमचा लढा केवळ ग्राहकांसाठी पर्यायांच्या स्वातंत्र्यासाठी आहे, असे या ग्रुपने स्पष्ट केले आहे. विविध इंधन मिश्रणाची किंमत, फायदे आणि परिणामांबद्दलचा डेटा स्पष्टपणे सार्वजनिक केला जावा. तसेच मायलेज, इंजिनची कार्यक्षमता, उत्सर्जन आणि देखभाल खर्चावर स्वतंत्र अभ्यास करून त्याचे निष्कर्ष जाहीर केले जावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here