E20 पेट्रोलमुळे मुंग्या आकर्षित होत नाहीत; BPCL ने सोशल मीडियावरील दावे फेटाळले

नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या दाव्यांना फेटाळून लावले आहे, ज्यामध्ये वाहनांच्या फ्यूल कॅपजवळ मुंग्या जमा होण्याचे कारण E20 पेट्रोल असल्याचे सांगितले जात होते. कंपनीने स्पष्ट केले आहे की, अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. बीपीसीएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर जारी केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, कंपनीने या दाव्यांची तपासणी केली असून E20 पेट्रोल आणि मुंग्या आकर्षित होणे यांच्यात कोणताही संबंध असल्याचा पुरावा आढळलेला नाही. कंपनीच्या मते, वाहनांच्या फ्यूल कॅपभोवती मुंग्या दिसण्याचा संबंध E20 पेट्रोलशी जोडणे दिशाभूल करणारे आहे.

इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या एथेनॉलमध्ये साखर नसते…

ChiniMandi WhatsApp Channel

बीपीसीएलने सांगितले की, पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरले जाणारे फ्यूल-ग्रेड एथेनॉल हे विशेष किण्वन (फर्मेंटेशन) आणि ऊर्ध्वपातन (डिस्टिलेशन) प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. या प्रक्रियेदरम्यान एथेनॉलमधील उरलेली साखर पूर्णपणे नष्ट होते.तसेच, इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या एथेनॉलमध्ये ‘डिनॅचुरंट्स’ मिसळले जातात, जे कीटक आणि इतर जीवांना दूर ठेवण्यास मदत करतात.

पेट्रोलचा वासच अधिक प्रभावी…

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एथेनॉल मिसळल्यानंतरही पेट्रोलचा हायड्रोकार्बन-आधारित विशिष्ट वास अधिक प्रभावी राहतो. त्यामुळे एथेनॉलचा वास मुंग्या किंवा इतर कीटकांना आकर्षित करतो, असा दावा चुकीचा आहे.बीपीसीएलने पुढे स्पष्ट केले की, पारंपरिक पेट्रोलच्या तुलनेत E20 पेट्रोलमधून कमी इंधन वाफ (फ्यूल व्हेपर) तयार होते. त्यामुळे कीटकांना आकर्षित करणारा कोणताही घटक त्यात नसतो.

सोशल मीडियावरील दावे निराधार…

बीपीसीएलने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, E20 इंधन आणि मुंग्यांची गर्दी यांच्यात कोणताही वैज्ञानिक संबंध आढळलेला नाही. सोशल मीडियावर प्रसारित होणारे दावे पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ऊस आणि एथेनॉल उद्योगासाठी E20 कार्यक्रम महत्त्वाचा…

भारत सरकार पेट्रोलमध्ये एथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला वेग देत आहे. या उपक्रमाचा उद्देश कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणे, ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि देशांतर्गत कृषी क्षेत्राला, विशेषतः ऊस-आधारित एथेनॉल उद्योगाला चालना देणे हा आहे.E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के एथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण असते. एथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस, बी-हेवी मळी आणि इतर कृषी-आधारित कच्चा माल वापरला जातो. त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here