इथेनॉल बंदीचा ऊस दरावर परिणाम नाही : खा. डॉ. सुजय विखे-पाटील

अहमदनगर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार शेतकर्‍यांना ऊस दर द्यावा लागेल. इथेनॉल बंदीचा विषय थेट शेतकर्‍यांशी निगडीत नाही. देशातील साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती बंदीचा ऊस दरावर कोणताच परिणाम होणार नाही, असा दावा खा. डॉ. सुजय विखे -पाटील यांनी केली. अहमदनगर येथे ते माध्यमाशी बोलत होते. यावेळी खा.डॉ. विखे-पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.

खा. डॉ. विखे-पाटील म्हणाले की, अनेक लोकांना भास होत आहेत. ते दिवसा स्वप्ने पाहत आहेत. महायुती सरकार शेतकर्‍यांशी प्रामाणिक आहे. सरकारने आतापर्यंत वेळोवेळी शेतकर्‍यांना मदतीचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे रस्त्यावर उतरणार आहेत. यावर बोलताना खा. विखे यांनी टीका केली. त्यांना कुठेही उतरू द्या, त्यांच्या उतरण्याने अथवा त्यांच्या चढण्याने काही एक फरक पडणार नाही. केंद्र सरकार पाठीशी असल्याने येत्या दोन दिवसांत यातून मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणावर कोणीही संयम सोडून बोलू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here