देशात ८०० कोटी लिटर इथेनॉल पुरवठा, धान्यापासून इंधन उत्पादनाचे प्रमाण ७६ टक्क्यांवर : ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन

नवी दिल्ली : ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनने (एआयडीए) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या १० महिन्यांमध्ये ८०० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. यातील ७६ टक्के इथेनॉलनिर्मिती धान्यापासून करण्यात आला आहे. ८०० कोटी लिटरचा टप्पा ओलांडणे ही भारताच्या इथेनॉल कार्यक्रमासाठी एक महत्त्वाची घटना आहे असे एआयडीएच्या उपमहासंचालक भारती बालाजी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, यावरून देशांतर्गत उद्योगाने गाठलेली मोठी व्याप्ती दिसून येते. धान्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलचा वाटा जूनमधील सुमारे ७३ टक्क्यांवरून जुलैमध्ये ७६ टक्क्यांपर्यंत वाढला असून, यात मका आणि एफसीआयकडील अतिरिक्त धान्याचा वाटा प्रत्येकी ३० कोटी लिटर आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडील खराब झालेल्या अन्नधान्यातून ११ कोटी लिटर इथेनॉल मिळाले. तसेच, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये उसापासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा वाटा २८ वरून २२ कोटी लिटरवर घसरला आहे.

नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०६ या काळातील हा इथेनॉल पुरवठा आहे. जुलै महिन्यात एकूण ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाल्याने ८०० कोटी लिटरचा टप्पा पार झाला. या महिन्यात धान्यापासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा वाटा ७१ कोटी लिटर इतका होता. एकूण मासिक पुरवठ्यात काहीशी घट होऊनही, धान्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलचा वाटा जूनमधील सुमारे ७३ टक्क्यांवरून जुलैमध्ये सुमारे ७६ टक्क्यांपर्यंत वाढला. देशांतर्गत उत्पादनक्षमता वाढत असताना आणि देश आपली स्वच्छ ऊर्जानिर्मितीची गतिशीलता आणि नवीकरणीय इंधनाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी इथेनॉलचा पर्याय तयार करीत आहे. एकूण मासिक पुरवठ्यातील उसाचा वाटा जूनमधील २७ टक्क्यांवरून जुलैमध्ये सुमारे २४ टक्क्यांपर्यंत खाली आला. उसापासून मिळणाऱ्या पुरवठ्यामध्ये ‘बी-हेवी मोलॅसिसचा वाटा १७ कोटी लिटर असून, उसाचा रस आणि ‘सी-हेवी मोलॅसिस’चा वाटा अनुक्रमे ४ आणि १ कोटी लिटर आहे. धान्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी या क्षेत्रात मका आणि ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एफसीआय) कडील अतिरिक्त धान्याचा वापर केला जातो.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here