ऊस थकबाकीप्रश्नी कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे सुरू

शहाजहांपूर : राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेने ऊस थकबाकीप्रश्नी मकसुदापूर येथील बजाज साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तर पुवयां मंडी समितीच्या शेतकरी भवनसमोर भाकियूच्या टिकैत गटाने आंदोलन सुरू आहे. राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला. बजाज साखर कारखान्याने गेल्यावर्षी खरेदी केलेल्या उसाचे ५० कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत, असे अमरजीत सिंह यांनी सांगितले. कारखान्याच्या अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेवूनही बिल देण्याची गती संथ असल्याचे ते म्हणाले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्याच्या गळीत हंगामातही कारखान्याने गाळपासाठी मोठ्या प्रमाणावर उसाची खरेदी केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना एक रुपयाही दिलेला नाही. त्यामुळे आंदोलन करण्याचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात सचिन मिश्र, गुरुनाम सिंह, पुरन सिंह, गुरबाज सिंह, दिलबाग सिंह, जगराज सिंह, गुरजिंदर सिंह, बलवीर सिंह, आदित्य कठेरिया, आयुष मिश्र, गुरुजंट सिंह आदी सहभागी होते. दुसरीकडे पुवायां मंडी समितीच्या शेतकरी भवनसमोर भाकियू टिकैत गट आणि तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या भानू गटाचे धरणे आंदोलनही सुरू राहिले. कडाक्याच्या थंडीच्या काळातही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महेंद्र पाल सिंह यादव, अनिल सिंह यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here