फिजीमध्ये चालू हंगामात आतापर्यंत ६०,००० टन साखर उत्पादन

235

सुवा : सध्याच्या कोविड महामारीच्या काळातही फिजीमध्ये या हंगामात उसाची तोडणी आणि गाळपाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ऊस उत्पादक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विमल दत्त यांनी सांगितले की, एफएससी कारखान्याने सादर केलेल्या कामगिरीच्या अहवालानुसार आतापर्यंत ७,००,००० टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यापासून ६,००,००० टनाहून अधिक साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.

परिषदेचे सीईओ दत्त म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात आपण खूप चांगले काम केले आहे. आणि कारखान्याच्या व्यवस्थापनात कोणताही गोंधळ झाला नाही. नियमांचेही चांगल्या पद्धतीने पालन करण्यात आले आहे. कोविडच्या काळात आपण चांगले काम करीत आहोत. हंगामाच्या सुरुवातीला अडचणी येऊनही उत्पादनात सातत्य राहीले. लबासा कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक २,५०,००० टन उसाचे गाळप केले आहे. आणि एकूण २४,००० टनाहून अधिक साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here