२००० रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत अनेक प्रश्नांची जाणून घ्या उत्तरे

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने २००० रुपयांच्या नोटा परत घेण्याबाबत सातत्याने सांगितले आहे की, ही प्रक्रिाया नोटबंदीसारखी नाही. मात्र, शुक्रवारी आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा परत घेण्याची घोषणा केल्यानंतर लोकांना २०१६ मधील नोटबंदीवेळी आलेल्या अडचणींची आठवण आली आहे. ज्या लोकांकडे अद्याप २००० रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशातील कोणत्याही बँकेत जावून नोटा बदलून घ्याव्यात. एकाच वेळी २०,००० रुपये म्हणजे १० नोटा तुम्ही बदलून घेवू शकता असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआयने सांगितले की, नोटा बदलण्याबाबत लोकांच्या मनात शंका असू नयेत. मात्र, या प्रक्रियेबाबत अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. लोकांना योग्य माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलताना ग्राहकाला कोणताही डेटा द्यावा लागणार नाही असे सांगण्यात आले आहे. मग याचा चुकीचा फायदा घेतला जावू शकतो असा दावा केला जात आहे. एका दिवसात २००० रुपायांच्या किती नोटा बदलू शकतो अथवा डिपॉझिट करू शकतो असाही सवाल आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एका वेळेस १० नोटा एका व्यक्तीला बदलून मिळतील. मात्र, एका दिवसात किती नोटा बदलल्या जातील याविषयी साशंकता आहे. एखाद्या बँकेत खाते नसले तरीही कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलता येतील, या नियमाचा गैर फायदा ब्लॅकमनी असलेले लोक घेऊ शकतात. मग या नोटबंदीचा हेतू काय आहे, असा सवाल लोकांचा आहे. जर या नोटांची छपाई दोन वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये बंद करण्यात आली तर मग इतक्या उशीरा नोटा बंद का केल्या अशीही लोकांची विचारणा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here