Ethanol Petrol Blending: इथेनॉल मिश्रणातून ४१,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (ethanol blending policy) इथेनॉल धोरणाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. देशाने निश्चित केलेल्या मुदतीआधीच १० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले आहे. आता २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सरकारकडून हरेक प्रयत्न केले जात आहेत. १० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या वापरामुळे ४१,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनात बचत झाली आहे, असा दावा पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केला. ऑटो उद्योगातील संस्था SIAM च्या एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना मंत्री चौबे म्हणाल्या की, भारताने अलिकडेच आपल्या निर्धारीत वेळीच्या ५ महिने आधी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले आहे.

त्यांनी सांगितले की, देशाच्या परकीय चलनाची बचत हो्यासह शेतकरी आणि साखर उद्योगाला याचा लाभ मिळाला आहे. चौबे म्हणाल्या की, सरकारचे पुढील उद्दीष्ट २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे आहे. ते २०२५-२६ पर्यंत पूर्ण होईल असे अनुमान आहे. देशातील इंधन आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी सांगितले की, जसजसे देशात इथेनॉलचे उत्पादन वाढेल, तसतसे कच्चे तेल (पेट्रोल उत्पादनासाठी उपयुक्त) समान प्रमाणात कमी होत जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here