चौदा एकर ऊस आगीत जळून खाक

102

हरिद्वार : पथरी परिसरातील एक्कड खुर्द गावातील ऊसाच्या फडाला अचानक आग लागली. या आगीमध्ये चौदा एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांनी कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

सायंकाळी एक्कड खुर्द गावातील गाव समाजाच्या जमिनीवरील उसाला अचानक आग लागली. परिसरातून जाणाऱ्या प्रवाशांनी याची माहिती गावातील प्रमुखांना दिली. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी आणि लेखापाल अनिल कुमार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. ग्राम समाजाच्या जमिनीवरील ऊस पीक महसूल विभागाने गावच्या प्रमुखांच्या ताब्यात दिले आहे. आगीत १४ एकर ऊस जळाला. लेखापाल अनिल कुमार म्हणाले, जवळजवळ १४ एकर ऊस जळाला आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. गावचे सरपंच मोहम्मद हारुण यांनी सांगितले की आग कशामुळे लागली हे शोधले जाईल. पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here