गोवा : पेट्रोलमधील २० टक्के इथेनॉल मिश्रण सक्तीविरोधात ‘आप’ची देशव्यापी मोहीम, गोव्यातही सक्रीय मोहीम

पणजी : ई-२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारने ई-२० पेट्रोल सक्तीचे केल्याच्या विरोधात आम आदमी पक्षाने (आप) देशव्यापी मोहीम तीव्र केली असून, या मोहिमेत गोवाही सक्रियपणे सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाचे गोवा संयोजक वाल्मीकी नाईक यांनी दिली. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मॅन्युएल कार्दोजो आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

वाल्मीकी नाईक म्हणाले की, आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ई-२० पेट्रोलविरोधातील राष्ट्रीय मोहिम सुरू केली आहे. पेट्रोलमध्ये सक्तीच्या २० टक्के इथेनॉल मिसळणे चुकीचे आहे. ग्राहकांना शुद्ध पेट्रोल मिश्रणाचा पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या इंधनाच्या परिणामांबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली आहे. तसेच, ई-२० इंधनामुळे वाहनांचे नुकसान झाल्यास संबंधित ग्राहकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here