देशामध्ये गेल्या 24 तासात समोर आले 19,078 नवे रुग्ण, 224 जणांचा मृत्यु

नवी दिल्ली: देशामध्ये कोरोना संक्रमणाबाबत सातत्याने घट होत आहे. देशामध्ये गेल्या 24 तासात कोरोना संक्रमणाचे 19.078 नवे रुग्ण समोर आले आहेत. 224 लोकांचा मृत्यु झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवार सकाळी ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाचे 19,078 नवे रुग्ण समोर आले आहेत. याबरोबरच देशामध्ये संक्रमणाचे एकूण रुग्ण 1,03,05,788 झाले आहेत. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे 224 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामुळे कोरोनामुळे जिव गमावणार्‍यांची संख्या 1,49,218 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात 22,926 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशामध्ये आतापर्यंत 99,06,387 लाख रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. रोज आधार वर नोंद होणार्‍या नव्या रुग्णांच्या तुलनेत बर्‍या होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे. यामुळे कोरोनाचे सक्रिय रुग्ण कमी आहेत. देशामध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण कमी होवून 2,50,183 इतके राहिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here