आशिया, युरोपमध्ये उत्पादन वाढल्याने जागतिक साखर पुरवठ्यात सुधारणा शक्य : StoneX

न्यूयॉर्क : आशिया आणि युरोपमध्ये साखर उत्पादन वाढल्याने या महिन्यापासून सुरू झालेल्या २०२१-२२ या हंगामातील जागतिक साखर पुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे असे स्टोनएक्स (StoneX) संस्थेने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये ब्राझीलमध्ये या वर्षी खराब हवामानामुळे घटणाऱ्या साखर उत्पादनाची भरपाई होण्याचीही शक्यता आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अहवालात म्हटले आहे की, साखर उत्पादनात सुधारणांनंतरही हंगामात सलग तिसऱ्या वर्षी उत्पादनापेक्षा अधिक मागणी दिसून आली आहे. २०२०-२१ मध्ये २.९ मिलियन २०२१-२२ मध्ये ८,००,००० टन कमी होण्याचा अंदाज आहे. नव्या हंगामात थायलंडमधील साखर उत्पादन ३९ टक्क्यांनी वाढून १०.५ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. तर आशियातील संपूर्ण अनुकूल हवामानामुळे भारतात ३१.५ मिलियन टनापर्यंत उत्पादन आणि चांगले पीक होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत ते २ टक्क्यांनी अधिक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here