ISMA कडून केंद्र सरकारकडे इथेनॉलचा दर वाढविण्याची मागणी

नवी दिल्ली : इथेनॉलचा दर वाढवून प्रती लिटर ६९.८५ रुपये करावा अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाला लिहिलेल्या पत्रातून केली आहे. पत्रात म्हटले आहे की, २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण करण्यासाठी जवळपास १२०० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. साखर उद्योगाने २०२२-२३ मध्ये ४०० कोटी लिटरचे करार केले आहेत. आणि अतिरिक्त ८०० कोटी लिटरसाठी ISMAच्या अनुमानानुसार मोठ्या प्रमाणात क्षमता वाढीसाठी १७,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज भासेल. २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या (ईबीपी) रोडमॅपअंतर्गत ISMA ने हे आवाहन केले आहे.

योग्य परताव्याशिवाय उद्योग, बँका ही अतिरिक्त गुंतवणूक करू शकणार नाहीत. सध्याच्या किमतीची व्यवहार्यता चालू वर्षातील रसाचा कमी पुरवठा आणि सरकारच्या अपेक्षांमउळे कमी होत आहे. ISMA ने मागी केली आहे की, सर्व पुरवठादारांसोबत टीपीएच्या सध्याच्या प्रणालीवर स्वाक्षरी केली जावी. ओमसींकडून जारी निविदांमधील अटींमध्ये काही सुधारणा करून व्याज सवलत योजना सुरूच ठेवावी. एफआरपीमधील वाढ, उत्पादनातील इतर खर्च लक्षात घेऊन इथेनॉलच्या दरात बदल केले जावेत. ISMA च्या म्हणण्यानुसार, उसाच्या प्रती क्विंटस ३१५ रुपये एफआरपीचा विचार करताना, रस, सिरपपासून उत्पादित इथेनॉलचा दर ६९.८५ रुपये प्रती लिटर करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here