शासनाने ‘एफआरपी’च्या समप्रमाणात ‘एमएसपी’मध्येही वाढ करणे गरजेचे : स्वरूपाराणी मोहिते-पाटील

सोलापूर: सहकारमहर्षी सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, सभासद, उपस्थित होते. श्री सत्यनारायण महापूजा विराज निंबाळकर व विशाखा निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की, गेल्या सहा वर्षांत एफआरपीमध्ये ११८ टक्क्यांनी वाढ झाली; मात्र एमएसपीमध्ये त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. कारखान्याचा उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत जाणवत असून, शासनाने एफआरपीच्या समप्रमाणात एमएसपीमध्येही वाढ करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांची संख्या वाढली; मात्र उसाचे क्षेत्र वाढले नाही. उपलब्ध क्षेत्राला पुरेसे पाणी नाही. गत पाच वर्षांत पाऊसही कमी पडत आहे. याचा विचार करून साखर उद्योगाला राज्य आणि केंद्र सरकारकडून अधिक पाठबळाची गरज आहे. दरम्यान, बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाला कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here