‘कपिश्वर शुगर’चे बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात, चेअरमन अति अतिश दांडेगावकरांच्या हस्ते पूजन

हिंगोली : वसमत व औंढा तालुक्याच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कपिश्वर शुगर अँड केमिकल्स लिमिटेड, जवळा बाजार या कारखान्याच्या २०२६-२७ च्या सातव्या गळीत हंगामाचा गव्हाण व मोळीपूजन समारंभ बुधवारी (ता. २१) उत्साहात पार पडला. कारखान्याचे चेअरमन अतिश दांडेगावकर (साळुंके) व त्यांच्या पत्नी स्मितल दांडेगावकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचेसंचालक श्रीनिवास बिहाणी यांच्यासह संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या सहा गळीत हंगामांप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या दृष्टीने कारखाना प्रशासनाने तयारी केली आहे. ऊस उत्पादकांना ३,०११ रुपयांचा भाव कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार ११ रुपयांचा भाव देण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत गळीत हंगामाचे नियोजन करण्यात येत असून, शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास आणि सहकार्य यापुढेही कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here