कर्नाटक : व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर भाग्यलक्ष्मी शुगर कर्मचारी संघटनेचे धरणे आठवडाभरासाठी स्थगित

बेळगाव : कुप्पटगिरी येथील ‘भाग्यलक्ष्मी शुगर एम्प्लॉईज युनियन’चे पदाधिकारी आणि भाग्यलक्ष्मी शुगरच्या व्यवस्थापकीय संचालकांमध्ये सोमवारी (ता.६) झालेल्याकर्मचारी संघटना बैठकीत हंगामी कामगारांना नियमांनुसार पुन्हा कामावर घेणे व सातव्या वेतन मंडळाच्या थकबाकीबाबत उपकामगार आयुक्तांच्या उपस्थितीत लेखी करार करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर सुरू होणारे नियोजित धरणे आंदोलन सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा भाग्यलक्ष्मी शुगर एम्प्लॉइज युनियनने जाहीर केला आहे.

याबाबत संघटनेने सांगितले की, कारखाना व्यवस्थापनाने कामगारांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर कामगार संघटनेने हा निर्णय घेतला. आम्ही हंगामी कामगारांना ज्येष्ठतेच्या आधारे पुन्हा कामावर घेणे, सातव्या वेतन मंडळाची थकबाकी देणे, या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मुद्यांवर आंदोलनाची पूर्वसूचना संघटनेने प्रशासनाला दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ७ जुलैपासून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांचा विचार करून आंदोलन आठवडाभरासाठी स्थगित केल्याचे अध्यक्ष सुनील झुंजवाडकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, ठरलेल्या मुदतीत आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here