कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्यात अडीच वर्षानंतर होणार स्वीकृत संचालक निवडी

कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याची निवडणूक डिसेंबर २०२३ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत दिवंगत पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पाटील, ए. वाय. पाटील, अरुणकुमार डॉगळे, वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २५ पैकी २४ जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली होती. तर विरोधी आघाडीचे धैर्यशील पाटील-कौलवकर हे एकमेव विजयी झाले होते. निवडणुकीनंतर संचालक मंडळ नियुक्त दोन तज्ज्ञ संचालकांची निवड होणार होती. विविध कारणांनी गेली अडीच वर्षे रखडलेल्या स्वीकृत तज्ज्ञ संचालकांच्या निवडी मेच्या पहिल्या आठवड्यात होण्याचे संकेत आहेत.

स्वीकृत संचालकांच्या दोन जागांपैकी एक जागा राहुल पाटील गटाला करवीरमध्ये देण्यात येईल, तर दुसरी जागा ए. वाय. पाटील गटाला राधानगरीमध्ये देण्यात येईल. या दोन्ही जागांवर ‘भोगावती’च्या माजी संचालकांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. स्वीकृतच्या दोन आणि शासननियुक्त तिन्ही जागा कारखान्याची दोन्ही पदाधिकारी पदे असलेल्या दोन पक्षांकडेच जात असल्याने आघाडी अंतर्गत शेका पक्ष, डोंगळे गट आणि जनता दलामध्ये अस्वस्थता आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेताना सर्वच गटातटांनी इच्छुकांना स्वीकृत संचालक निवडीचे आश्वासन दिले होते. मात्र, माजी आमदार पी. एन. पाटील यांचे झालेले आकस्मित निधन आणि त्यानंतर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, विधानसभा, स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांमुळे स्वीकृत संचालक निवडी रखडल्या होत्या. मेच्या पहिल्या आठवड्यात या निवडी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here