कोल्हापूर : दिवाळी पाडव्याला गूळ हंगामाचा शुभारंभ; पहिल्याच सौद्याला प्रतिक्विंटल ७,०११ रुपयांचा विक्रमी दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर यंदाच्या गूळ हंगामातील पहिला सौदा उत्साहात पार पडला. हंगामाच्या पहिल्याच सौद्यात गुळाला प्रतिक्विंटल ७,०११ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. बाजार समितीत दाखल झालेल्या ५१ रव्यांना हा दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता अडत व्यापारी बाबूराव अतितकर यांच्या दुकानात गुळाच्या सौद्यांना सुरुवात झाली. बाजार समितीचे सभापती प्रा. शेखर देसाई यांच्या हस्ते पहिल्या सौद्याचा शुभारंभ करण्यात आला.

या सौद्यात तळाशी येथील शेतकरी लासो पांडुरंग बिरांडे यांच्या ५१ रव्यांच्या गुळाला प्रतिक्विंटल सर्वाधिक ७,०११ रुपये दर मिळाला. गूळ व्यापारी शिवगोंडा दादा सदलगे यांनी हा गूळ खरेदी केला.यावेळी बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग काशीद, अॅड. प्रकाश देसाई, भारत पाटील (भुयेकर), शंकर पाटील, संभाजी पाटील, सुयोग वाडकर, कुमार आहुजा, आकाराम केसरे, समितीचे सचिव तानाजी बाळू ढळवी, उपसचिव वसंत पाटील, जीवन जाधव, शाहूपुरी मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष प्रवीण लिंगाडे यांच्यासह बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पहिल्याच सौद्यात मिळालेल्या समाधानकारक दरामुळे आगामी गूळ हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here