कोल्हापूर : आमदार रोहित पवार यांच्याकडून दत्त-शिरोळ साखर कारखान्याच्या क्षारपडमुक्ती प्रकल्पाचे कौतुक

कोल्हापूर : कृषिभूषण राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेगुलंद येथे राबविलेल्या ‘क्षारपड जमीन मुक्ती’ प्रकल्पाची आणि शेडशाळ येथील ‘महिला सेंद्रिय बीज भांडाराची’ प्रत्यक्ष पाहणी केली. दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले क्षारपडमुक्त जमिनीचे काम दिशादर्शक आहे. शिवाय सेंद्रिय बीज भांडारातून पुढच्या पिढीला आरोग्य चांगले मिळावे, यासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. ‘दत्त’चा क्षारपड मुक्तीचा प्रकल्प दिशादर्शक असून हा प्रकल्प बारामती या भागातही राबवता येईल, असे पवार म्हणाले.

यावेळी दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी उपक्रमांची माहिती दिली. कारखान्याने कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथे सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे ७५० एकर जमीन क्षारपडमुक्त करण्यात आली आहे. ज्या जमिनीत गेल्या ४०-५० वर्षांपासून काहीही पिकत नव्हते, तिथे आता एकरी ६० ते ७० टन उसाचे उत्पादन निघत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. आमदार पवार यांनी या तंत्रज्ञानाचे आणि अंमलबजावणीचे कौतुक करत हा प्रयोग राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे नमूद केले. दत्त’चे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक, संचालक भय्यासाहेब पाटील, दरगू गावडे, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, संजय पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, सुदर्शन तकडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here