कोल्हापूर: येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा २४वा गळीत हंगाम प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ झाला. संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी मंगल कांबळे यांच्या हस्ते काटापूजन झाले. गत हंगामात गाळपास आलेल्या उसास अंतिम हप्ता प्रतिटन ५० देणार आहे. ५० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम दोन कोटी तीन लाख ७४ हजार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मंगळवारी वर्ग करणार आहे. गत हंगामातील उसाला अंतिम हप्त्यासह प्रतिटन ३५०० रुपये दिले जात आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील म्हणाले की, कारखान्याने २०२५-२६ च्या हंगामात एफआरपीपेक्षा १७५ रुपये जादा दर दिला आहे. जादा दर देण्याची कारखान्याची परंपरा यापुढेही कायम ठेवून उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करू. कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, पांडुरंग पडवळ, उदय देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी, सुशांत नाईक, इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर उपस्थित होते. कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी स्वागत केले. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले.


















