कोल्हापूर : ‘गोडसाखर’ कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण, आता रोज करणार चार हजार टन ऊस गाळप

कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातील (गोडसाखर) आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. यंदा रोज साडेतीन ते चार हजार टन ऊस गाळप करण्याच्या तयारीत आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्रीचे नूतनीकरण केले असून वजनकाटे, गव्हाणी, मिल आणि डिस्टिलरीसह विविध यंत्रणांमध्ये सुधारणा केली आहे. तसेच ऊस तोडणी-ओढणी यंत्रणाही सक्षम केल्याने यंदाचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याला बळ मिळाले आहे. या सुधारणांमुळे रोजच्या गाळप क्षमतेत एक ते दीड हजार टनांची वाढ होणार असून, यंदाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक आणि कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष पताडे यांनी सांगितले की, कारखान्यात सत्तांतर झाले आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुश्रीफ यांनी सलग तीन वर्षे कारखान्याला अर्थसाहाय्य दिल्याने कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यास मदत झाली. कारखान्याने अधिक वजनाची वाहने हाताळण्यासाठी वजनकाट्याची क्षमता वाढविली आहे. तर कार्यक्षमता सुधारण्यासाठी डेन्सिटी इनहॅन्सर, ब्रह्मास्त्र फायबरायझर बसविले आहेत. आता ३६ बाय ७२ आकाराच्या मिलमुळे गाळप क्षमता वाढणार असून बॉयलरची कार्यक्षमता वाढल्याने बगॅस, वाफेची बचत होणार आहे. साखरेचा उतारा सुधारण्यासाठी ऑलिव्हर फिल्टरची सोय करण्यात आली असून दोन मीटरच्या हॉपर यंत्रणेमुळे साखरेचा प्रवाह सुधारणार आहे. कारखान्याने डिस्टिलरीमध्ये ईएनए आणि इथेनॉल निर्मितीसाठी आवश्यक बदल केले असून वायूचे प्रदूषण रोखण्यासाठी चिमणीला वेट स्क्रबर बसविला आहे. ईटीपीचे आधुनिकीकरण पूर्ण झाल्याने दररोज पाच लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया शक्य होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here