कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना संचालकपदी प्रधान भोजे, अनिल कांबळे यांची निवड

कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या रिक्त संचालकपदी मौजे सांगावचे प्रधान रावसो भोजे व कुरणीचे अनिल परसू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक उपसंचालक जी. जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या. प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. दरम्यान, नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष संजय मंडलिक यांच्या हस्ते दोघांचा सत्कार झाला. प्रधान भोजे, अनिल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष आनंदा फराकटे, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, वीरेंद्र मंडलिक, विश्वास कुराडे, धनाजी बाचणकर, प्रदीप चव्हाण, कृष्णा शिंदे, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, संभाजी मोरे, आदी उपस्थित होते. संचालक महेश घाटगे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here