कोल्हापूर : नरंदे येथील शरद साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तसेच विविध ठिकाणी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. संचालक आदित्य पाटील-यड्रावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी, कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे उपस्थित होते.
शरद कारखाना कामगारांच्या श्रमाचा सन्मान करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका घेण्यात आघाडीवर राहिला आहे, असे यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी कामगार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. उदय भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील म्हणाले, शामराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासत काटकसरीने कारभार केला. त्यामुळे कारखाना मजबूतपणे उभा आहे. उपाध्यक्ष संपत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष बबन भंडारी यांनी आभार मानले.


















