कोल्हापूर : साखर वाहतूक करणारा ट्रक नाल्यात उलटला, दुचाकीला चुकविताना अपघात

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्यातून आलूरकर ट्रान्सपोर्टमार्फत कोल्हापुरातील रेल्वे गुड्स यार्डमध्ये साखर घेऊन जाणारा ट्रक केर्ले ओढ्याजवळ आला असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविताना बाजूच्या नाल्यात उलटला. ट्रक चालक व मालक सागर भांडवलकर यांनी प्रसंगावधान ओळखून रिमझिम पावसात समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविताना ब्रेक मारल्यानंतर सुमारे ५० फूट ट्रक घासत गेला. त्यामुळे दुचाकीस्वार वाचला. मात्र ट्रक बाजूच्या नाल्यात उलटला.

मिळालेल्या माहितीनुसार, केर्ले-कोतोली रस्त्यावरील केर्ले ओढ्याजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रकमध्ये अंदाजे २५ टन साखर भरलेली होती. साखरेचे नुकसान होऊ नये म्हणून दालमिया साखर कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन साखर सुरक्षित ठिकाणी नेली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ती पूर्ववत करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here