कृष्णा कारखान्याचा 5 लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण : चेअरमन डॉ. सुरेश भोसले

सातारा : सातारा जिल्ह्यात ऊस गाळपाला वेग आला आहे. कराड तालुक्यातील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., (रेठरे बु) केवळ 47 दिवसात 5,00,191 मेट्रिक टन गाळप केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. डॉ. भोसले म्हणाले कि, सरासरी प्रतिदिन ऊस गाळप 10,700 मेट्रिक टन करण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा 11.36 टक्के मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. सभासद शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठबळामुळेच कारखान्याला हे यश मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here