लातूर : जागृती शुगर्सकडून शेतकरी सभासदांना दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात साखर वाटप

लातूर : दिवाळीचा सण शेतकरी सभासदांना आनंदात आणि उत्साहात साजरा करता यावा, यासाठी देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अध्यक्षा गौरवी अतुल भोसले-देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे आणि संचालक मंडळाच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत कारखान्याच्या प्रत्येक शेतकरी सभासदाला दिवाळीनिमित्त प्रति किलो ३५ रुपये या सवलतीच्या दराने १५ किलो साखर दिली जात आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सभासदांना दिलासा मिळणार आहे.साखर घेण्यासाठी सभासदांनी २ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कारखान्याच्या शेती विभागाच्या गट कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्डची सत्यप्रत सोबत आणावी, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकरी सभासदांना सवलतीच्या दरात साखर उपलब्ध होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here