लातूर : उजना येथे सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या १५ व्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन उत्साहात करण्यात आले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव होते. व्यासपीठावर व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात उत्कर्ष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी योग्य उसाची लागवड करून त्याची कारखान्याकडे नोंद करावी असे आवाहन पाटील यांनी केले.
सहकारमंत्री पाटील म्हणाले की, सिद्धी शुगर कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली असून, अहमदपूर व चाकूर तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. आगामी काळात कारखान्याच्या माध्यमातून अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते कर्मचारी व शेतकरी सभासदांच्या सहकायनि पूर्ण होईल. भविष्यात कारखाना अधिक क्षमतेने चालविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. अविनाश जाधव यांनी प्रास्ताविक केले. संभाजी चोपणे यांनी सूत्रसंचालन केले. पी.जी. होनराव यांनी आभार मानले.


















