लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विलास कारखान्यातर्फे वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप

लातूर: माजी मुख्यमंत्री आणि माजी, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीचे औचित्य साधून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी) यांच्या वतीने लातूर येथील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप करून एक आदर्श सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली.

मंगळवारी सकाळी सर्वप्रथम कारखाना स्थळावर विलासराव देशमुख साहेब यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार वैजनाथराव शिंदे आणि कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखाना स्थळावरील अभिवादन कार्यक्रमानंतर मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी कारखान्याचे संचालक रविंद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसुल पटेल, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दिपक बनसोडे, शाम बरुरे, सुभाष माने व रमेश देशमुख यांच्यासह कारखान्यातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here