महाराष्ट्र : राज्यात गाळपासाठी २१३ कारखान्यांचे अर्ज, परवाने मात्र फक्त ३० कारखान्यांना

पुणे : यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर सुरू करण्यासाठी सप्टेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार १०६ सहकारी आणि १०७ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी ४० सहकारी आणि ४५ खासगी कारखान्यांच्या अर्जावर प्रादेशिक स्तरावर छाननी सुरू आहे. काही अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे, अटींच्या पूर्ततेबाबत तपासणी केली जात आहे. परवाना वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे.

आयुक्तालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत केवळ ३० साखर कारखान्यांना परवाने मिळाले आहेत. तर २३ सहकारी आणि १९ खासगी कारखान्यांच्या अर्जाबाबत स्थगिती अथवा रद्द करण्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे हंगामाची सुरुवात संथ गतीने असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गुरुवारपासून अधिकृतरित्या यंदाच्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली. यंदा पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत उसाची अपेक्षीत वाढ झालेली नाही. त्यामुळे हंगाम लवकर सुरू केल्यास उसाच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गाळपाचे नियोजन, परवाना प्रक्रिया आणि उसाची उपलब्धता यांचा समतोल साधण्याचे आव्हान साखर उद्योगासमोर आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

हंगाम लवकर सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शेतकरी संघटनांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, काही कारखान्यांनी गाळप परवान्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्या १४ कारखान्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत तात्पुरता दिलासा दिला होता. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी परवान्याशिवाय गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. परवान्याशिवाय कोणत्या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे का, याची तपासणी सुरू आहे. असे आढळल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here