चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किनारपट्टी भागात सतर्कतेचे आदेश

109

मुंबई : भारतीय हवामान विभागाने तौकते चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी तौकाते चक्रीवादळाबाबत गंभीर सूचना दिली आहे. १७ मे रोजी याचे चक्रीवादळात रुपांतर होऊ शकेल असे सागंण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना खास करून किनारपट्टीच्या परिसरात, तौकते चक्रीवादळाची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आणि सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या ट्वीटनुसार तौकाते चक्रीवादळाची शक्यता गृहीत धरून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासन, सर्व विभागीय अधिकारी आणि पालघर, रायगड, रत्नागिरी आण सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. चक्रीवादळाशी लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here