महाराष्ट्र : राज्यातील सर्व पात्र साखर कामगारांना कर्जमाफी देण्याची समन्वय समितीची मागणी

शिर्डी : राज्यातील साखर कामगारांचे पगाराचे एक हजार ते दोन हजार कोटी रुपये थकित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कामगार कर्जमाफीसाठी पात्र झाला पाहिजे, असे मत अहिल्यानगर जिल्हा साखर कामगार समन्वय समितीच्या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आले. येथील साई पालखी निवारा या कार्यालयामध्ये ही बैठक झाली. आज विधानसभेत राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी सहकार मंत्र्याकडे आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. त्यांचे या मीटिंगमध्ये सर्व कामगार संघटनांच्यावतीने आभार मानण्यात आले.

प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले की, कारखाना पातळीवरील कामगार संघटना अगोदर मजबूत करा. राज्य संघटना आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून, राज्य पातळीवरील विविध प्रश्न सोडवण्यास अडचण निर्माण होणार नाही. सरचिटणीस राऊ शंकर पाटील यांनी राज्यातील साखर कामगारांचे एक हजार ते दोन हजार कोटी चे पगार थकित आहे. यामुळे राज्यातील सर्व साखर कामगार कर्जमाफीसाठी पात्र ठरले पाहिजेत. प्रत्येक कामगार संघटनांनी जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना भेटून कर्जमाफीविषयी त्यांच्याकडे मागणी करावी असे आवाहन केले. प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष व समन्वय समितीचे सरचिटणीस डी.एम. निमसे यांनी प्रास्ताविक केले. मुळा कारखाना युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यांनी स्वागत केले. कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, सहसचिव संजय मोरबाळे, महासंघाचे सरचिटणीस आनंद वायकर, अविनाश आपटे, ज्ञानदेव पाटील आहेर, रवी तांबे, कैलास जाधव, नितीन गुरसळ, मनोहर शिंदे, शेषनारायण मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर कारखान्याचे अशोक आरगडे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here